Friday, August 5, 2011

आजीची गोधडी...

आजीची गोधडी...

आईची आई ..म्हणजे आजी.माझी आजी म्हणजे इंदिराबाई पांडुरंग देशपांडे ...परवाच गेल्या ...खर तर अजून आहेत असेच वाटते ...त्यांची करारी नजर..सरळ नाकाचा दरारा...न थांबता काम करण्याचा धाक..स्वच्तेचा हव्यास ..सारे आमच्याबरोबर च आहे...
मातृ कुलाकडून छान सावळ्या रंगाचा वारसा असताना आजीबाई मस्त केतकी गोरा रंग घेऊन जन्माला आलेल्या...
जावली तालुक्यात देशपांडे यांच्या थोड्या जमिनीच्या ठिकाणी लग्न होऊन गेल्या....यथावकाश आमच्या आजोबांबरोबर मुंबई..चेंबूर ला ...स्वदेशी मिल मध्ये काम करणाऱ्या माझ्या गिरणी कामगार आजोबांबरोबर संसार...चेंबूर हे एक कोकणातील वाडी होते त्यावेळी ..
कुलसुमबाई चाल नामक छान दुमजली चाळीत आजी राहायची...आम्ही लहानपणी तिला भेटायचो...
सुतापासून येणारा अस्थमा घेऊन आजोबा गेले..मग आजी पोळ्या करण्याची कामे घेऊन तेथेच तगून राहिली..कधी तिने कागदी पिशव्या केल्या..कधी काही ,कधी काही...
नंतर आजी ती खोली विकून ३ मुलींच्य आणि ३ जावयांच्या भरोश्यावर मुंबई ला राम राम करती झाली...
तिच्या चाळीजवळ छान मोठी विहीर होती...कासवांची...स्वच पाणी अजून आठवते...
मग आजी कधी या मुलीकडे राही,कधी त्या...
पण जेथे असेल तेथे..कामाचा ठसा,कमी बोलून व्रतस्थ राहिल्याप्रमाणे राहिली....
तिची सुती पातळे आम्हा नातवंडांची मऊ दुलई असायची..
कलावती आईंची पोथी ती वाचत असे...
१९४८ च्या गांधी हत्येनंतर खर्शी या गावचे घर पेटवले गेले ,माझी आई त्यावेळी तान्हुली होती...
आजीचे आयुष्य तेव्हापासून हाताबाहेर गेलेले...
काळाप्रमाणे नशीब बदलले ,आजीच्या मुली कुठे कुठे स्थिर स्थावर झाल्या...
पण आजीच्या चेहऱ्यावरचा विषाद कायम राहिलेला..
सन ,वाढदिवस,गौरी,गणपती ला तिच्या बचती मधून ती काही पैसे आवर्जून हातावर ठेवे..
वालाच्या उसळीसाठी वाल निवडताना,पेपर वाचताना ,असे अनेक फोटो मी काढले...तिच्या नकळत ..
ते पहिले कि ती अम्लान हसत असे...
माझी खूप काळजी तिला..
गौरी म्हणजे माझ्या बायकोशी तिचा ऋणानुबंध जडलेला..
दोघी घरात सरस्वती आणि लक्ष्मि नांदाविण्यात पटाईत..
गौरी ची सजावट,गणपतीची तयारी...
दोघींच्या कष्टाने सारे सजायचे..
माझ्या सासू बाईनी मला मुलगा म्हणजे पणतू झाल्यावर पणजी आजी च्या डोक्यावर सुवर्ण फुले उधळली होती...
खूप आठवणी..
माझी आई ,आजी प्रमाणे कष्टाचा अथक वारसा घेऊन आलेली..
तिचा तर विशेष ऋणानुबंध आजीशी जडलेला...
आजीच्या शेवटच्या आज्र्पानात हि आजी स्वच्ते बद्दल जागरूक..परालीसीस ने वाचा गेली तरी वेग वेगळे आवाज काढून ती स्वताला स्वच ठेवण्याबद्दल सुचवत असे...
या आजारपणात मावशी आणि काकांनी खूप काही केले...अनेक जागरणे ,हॉस्पिटले .....
ती गेली ..
तेव्हा खरच रिमझिम पाऊस निनादात होता...
तिने १९४८ चे जळीत पहिले .तिने गिरणी कामगारांचे जीवन पहिले,पोळ्या लाटल्या,कागदी पिशव्या चिकटवल्या .. मुलींचे ब्लॉक पहिले,नातुंची प्रगती पहिली,विमानात बसली,
पण या सार्यात ती होती ,आणि नव्हती पण..
तिचे जीवन ती जगली कि नाही ,कुणास ठाऊक ...

तिच्या मऊ पातळाची गोधडी ती ठेवून गेली आहे...

आणि आमच्या डोळ्यात अनेक वर्षांचा पाउस...
http://www.facebook.com/note.php?saved&&note_id=260671847277498
http://www.facebook.com/note.php?saved&&note_id=260671847277498