Sunday, August 12, 2012

दिल्ली अनुभव क्रमांक ५) :राजेश पायलट आणी काश्मीर

दिल्ली मला जेव्हा नवी होती ,तेव्हा म्हणजे १९९६ चा हा किस्सा आहे.ज्ञान प्रबोधिनीच्या १० कार्यकर्त्या समवेत मी काश्मीर अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो...काश्मीर तेव्हा भीषण परिस्थितीत होते...देशी-परदेशी पत्रकारांनी पण तेथे जाणे जवळ जवळ बंद केले होते..अशा वेळी आम्ही १२ दिवस जीव धोक्यात घालून सामन्यापासून अतिरेकी नेत्यांपर्यंत सर्वांशी संवाद साधून दिल्लीत आल
ो.गृह राज्य मंत्री राजेश पायलट यांची भेट सायंकाळी घरी मिळाली .त्यांना आमच्या कडील माहितीचे गांभीर्य समजले .त्यांनी तातडीने त्यांच्या ब्लेक केट कमांडो समवेत व्हेन मधून नॉर्थ ब्लोक मध्ये त्यांच्या कार्यालयात तरुण उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडे पाठवले...ब्लेक केट कमांडो हि संकल्पनां तेव्हा नवीन होती...आम्हाला भलतेच अप्रूप वाटले ...! नॉर्थ ब्लोक मध्ये त्या अधिकार्याबरोबर खूप चर्चा झाली ...पुन्हा कमांडो समवेत व्हेन मधून राजेश पायलट यांच्या घरी !

...आता अनोळखी कार्यकर्त्यांबाबत अशी संवेदना कोणी दाखवत नाही...
-----------
दिल्ली अनुभव ४)
दिल्ली मध्ये किंचित पाउस पडला कि किंचित दमट पण दिल्लीकरांना आल्हाद दायक वाटणारे वातावरण तयार होते...संसदेतून येणाऱ्या एका माननीय खासदारांची आणी माझी भेट थोडी उशिरा होणार होती ,म्हणून मी सहज गाडी इंडिया गेट कडे वळवली .तर तेथे काळ्या कुळकुळीत गाड्यातून विदेशी वकिलातीची मंडळी आली होती...गाडी मळली नव्हती तरी पुसली जात होती ... बाईट वगेरे सुरु होते...अशा वेळी शाळेतून गमतीखातर इंडिया
गेट वर दफ्तर सह आलेल्या हसऱ्या ३ मुलांना काळ्या गाडीजवळ जाण्याची लहर आली...इंडिया गेट चा हवालदार त्यांना ते करू देणे शक्य नव्हते ....' पळा,नाही तर बदडेन एकेकाला..' असे म्हणून त्यांनी पोरांना हाकलून लावले...मला पंडित नेहरू आठवले ....इंडिया गेट परिसरात लगडलेल्या जांभळाच्या झाडाभोवती जांभळा साठी चढा ओढ -दंगा करणाऱ्या मुलांना हटकनाऱ्या पोलिसाला पंडित नेहरू यांनी तंबी दिलीच ....पण त्यानंतर जांभळांच्या झाडांची संख्या हि वाढली ....परवाच्या भेटीत जर मी पंडित नेहरू किवा परदेशी पाहुणा असतो तर त्या काळ्या कुळकुळीत गाडीतून त्या सामान्य मुलांना राजपथ सैर नक्कीच घडवली असती...(हजारो ख्वाईशे ऐसी कि हर ख्वाईश पर दम निकले...)
-------------
दिल्ली अनुभव क्रमांक ३ )
दिल्ली मध्ये मी पोहोचलो तर दुसर्या दिवशी उप राष्ट्रपती पदाचे मतदान सुरु होणार होते.ते करून सगळे आपापल्या मतदार संघात जाण्याच्या तयारीत होते.त्यातील समविचारी एका खासदार माननीया बरोबर दुपारचे जेवण घेतले.त्या आधी महाराष्ट्र सदन ला वाहिनीच्या पत्रकाराबरोबर गप्पा झाल्या...आदरयुक्त काळजीने त्यांना विचारले ,' आपल्या मराठी नेत्यांना मंत्री पदाची जबाबदारी झेपेल ना ? ' त्यावर मस्त उत्तर आले ,' मनमोहन सिंह यांना पंत प्रधान पद झेपते मग आपल्याला अमके तमके पद का झेपणार नाही ? ' ....मला आवडला हा युक्तिवाद !
---------------------
दिल्ली अनुभव क्रमांक २)
पुणे विमानतळावरील माननीय खासदारांच्या माजुर्ड्या अनुभवानंतर राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांना दिल्लीत भेटण्याचा प्रसंग आला. नुकताच पुणे स्फोटांच्या पार्श्व भूमीवर पुण्यात सी सी टीव्ही बसविण्यासाठी त्यांनी लोक प्रतिनिधींची बैठक आणी निधी ची तरतूद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.त्या दरम्यान त्या पुणे पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या तेव्हा गाडी पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर लावली ...सत्ताधारी पक्षाच्या खासदाराच्या थाटात पोर्च मध्ये घेतली नाही...आणी त्या चालकाला तसे कधी करू देत नाहीत....पूर्ण तपासणी करण्याचा आग्रह धरतात ,सर्व पूर्तता झाल्यावर सामान्य नागरिकाप्रमाणे आत जातात..असा साधे पणा दुर्मिळच !
----------------
दिल्ली अनुभव ! : क्रमांक १)
पुण्यावरून जाताना विमानतळावर शुभ्र सफारी..शुभ्र स्पोर्ट शु परिधान करून चेहऱ्यावर किंचित माजुर्डा ,कोरा भाव घेवून एक खासदार बोर्डिंग पास कौंटर जवळ आले...त्यांना हवी असलेली सीट मिळाली नाही म्हणून त्रागा करू लागले..तर तसा काही निरोप मिळाला नसल्याचे उत्तर छान इंग्रजीत मणिपुरी कर्मचारी नम्रतेने मुलगी सांगू लागली...तरी खासदार महाशय हटेनात ...मोठा राष्ट्रीय अपराध त्या विम
ान कंपनी कडून घडल्याचा त्यांचा अविर्व्भाव होता...त्या अमक्या तमक्या ला निरोप दिला होता ना...असे ते बडबंडले...त्या वर तो अमका तमका आमच्या विमान कंपनीत कामच करत नसल्याचे मणिपुरी सुंदरीने कळकळीने सांगितले...तरी माजुर्डे खासदार म्हणाले...'यह किसको बताऊ बोलो...उसकी खटिया खडी कर देता हू ...! ' खोट्या प्रतिष्ठेचे बळी असणारे असे खासदार दिल्लीत नेमके काय करत असतील ?
----------