Tuesday, March 26, 2013

बिलेटेड हेप्पी बर्थ  डे  ! मुख्य मंत्री साहेब उर्फ  ' बाबा ' !
आजोळी मेढ्यात (जावळी ) तालुक्यात शिकत असताना लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रेमला काकी चव्हाण म्हणजे पृथ्वीराज यांच्या मातोश्री ,यांचा एकदाच प्रचार दौरा व्हायचा .त्या वेळच्या कराड लोकसभा  मतदार संघात आम्ही मतदान करायचो .  नंतर बाबा आले . मग दिल्लीत बाबांबरोबर भेटी झाल्या .

रेसकोर्स रोड ला भल्या सकाळी त्यांच्या निवास स्थानी गेलो  कि टेनिस - बेडमिंटन  कोर्ट वरून येणारे बाबा दारात सुद्धा भेटायचे .

सोनिया गांधी यांच्या बद्दल मी कोणत्याही  मुलाखती -लेख देणार नाही असे सांगणारे बाबा दिल्लीत भेटायचे 

 एम  डी पी सी  आणि आम्ही आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र  ५ ० ' या  राष्ट्रीय परिषदेत सुद्धा आले .नटरंग  ' हा सिनेमा  तेथे  त्यांच्या  समवेत  आम्ही पाहिला .  मुख्यमंत्री झाल्यावर मात्र भेटी कमी झाल्या आहेत . म्हणून काल शुभेच्छा राहून गेल्या .
उशिरा  का होईना बाबा आपल्या वाढ दिवसानिमित्त शुभेच्छा  !  आपल्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती झाली  कि नाही ,हे मला सांगता  येणार नाही ,पण महाराष्ट्राला मुख्य मंत्री पदाची एक आगळी  वेगळी कारकीर्द आपण दिली आहे ,यात शंकाच नाही .

.
प्रश्न पत्रिकेचे नाव :मराठी पाऊल पडते पुढे  अर्थात महाराष्ट्राची  ' वादग्रस्त ' प्रगती ! :

जोड्या जुळवा आणि कारणे ,क्रम तपासा

प्रश्न :कोणी कोणास का कोठे कशासाठी  मारले ?

विजेत्यास महाराष्ट्र दिनी ' हक्क भंग भूषण ' पुरस्कार

१.राम कदम -अबू आझमी - आमदार टू आमदार

२.  हर्षवर्धन जाधव - कन्नड(मराठवाडा ) चे पोलिस -पोलिस  टू आमदार 

३. क्षितीज ठाकूर आणि यशस्वी आमदार सहकारी -सचिन सूर्यवंशी -आमदार टू पोलिस
ज्या वाटेवर गेलो ,तिथे तुझी भेट नाही
ज्या शिवारात हिंडलो ,तिथे तुझे शेत नाही
रण  रणत्या उन्हात ,तुझ्याकडे जाणारा एकही मेघदूत  नाही
दिसले हजारो चेहरे ,एकातही तुझे रूप नाही !

Sunday, March 24, 2013


क्या स्वाद है जिंदगीका ! 

उन्हाळा म्हणजे काही ठरलेली कामे गृहिणी ना करावी लागतात . त्यातील मसाले तयार करण्याचे काम 'सौ ' जन्याने पूर्ण झाले आहे .

माझी पत्नी गौरी आणि तिची बहिण गायत्री यांनी दोन्ही घरी वर्ष भर पुरेल असा तिखट आणि गोडा मसाला करून 'साठे बाजी ' करून ठेवली आहे ! त्यातील कांदा लसूण मसाला हि माझी फेवरीट मसाला रेसिपी आहे .सारवलेल्या अंगणात लाल भडक मिरच्या ,तेल लेवून ,तड तड्त्या उन्हात मस्त पहुडल्या आहेत,अशी (न ) काढलेली फोटो फ्रेम माझ्या मनात अजून ताजी आहे .

डंका तून मिरच्या कांडप करण्यापासून ,कांदा परतणे ,खोबऱ्याच्या काचऱ्या तळणे ,लसूण परतणे ,गरम मसाला तयार करणे नंतर 'तिखट मिसळणे ' असे अशा अनेक प्रक्रियातून तयार झालेला हा जहाल तिखट कांदा लसूण मसाला सातारा पद्धतीने आमच्या कडे केला जातो .( शेवटी हे तिखट मिसळताना हाताची लाही -लाही होते !) आमची आई हा मसाला जावळी परिसरात शिकली … जावळी -साताऱ्याच्या भूमीचा झणझणीत स्वाद आम्ही लहानपणी अंगिकारला । ( काही स्वाद आणि संवेदना थेट आईच्या पोटातून घेवून आपण जन्माला येत असतो )

तो आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे . आणि आता आम्ही तो पुण्यातील 'गोड्या'' कुटुंबात पण लोकप्रिय केला आहे . चित्पावन गौरीशी प्रेम विवाह झाल्यावर आंबट -गोड चवीची गम्मत मी शिकलो आहे आणि झण झणित थरार गौरी शिकली आहे !कोणत्याही भाजी -आमटी ची चव या मसाल्याने तयार होते . भरली वांगी ,बटाटा रस्सा ,डाळ -कांदा ,पावटा ,घेवड्याची रस्सेदार आमटी आदी रेसिपी तर या कांदा लसूण मसाल्याशिवाय सिद्धीस जात नाहीत . गरम भाकरी बरोबर दही -चटणी हा मेन्यु तर 'खल्लास ' लागतो ।

पण माझ्या लहानपणी एका गरीब मित्राने ,डोंबारयाच्या झोपडीत शिळा भात -लाल कांदा लसूण मसाला एकत्र करून त्यात तेलाऐवजी पाणी टाकून,कालवून खायला शिकवले होते ! ( तेल जपून वापरायचे लोक .तेव्हा गोडे तेल ही ' प्रेशस कमोडीटी ' होती त्या कुटुंबाना … )
त्याची आठवण आली की भातात लाल कांदा -लसूण घेतो मी, सर्वांची नजर चुकवून त्यात थोडे पाणी तेला ऐवजी मिसळायला घेतो ।
हा तिखट कांदा मसाला लसूण खाताना डोळ्यात पाणी येते ,ते सारे तिखट पणामुळेच असते असे नाही . काही आठवणी पण त्यात 'मिसळलेल्या ' असतात . ..



हा मसाला तयार झाला हे ओळखण्याची खूण त्याचा दरवळ हि असते…. हा कांदा -लसूण मसाला उर्फ 'तिखट ' टेस्ट करताना जिभेवर थरार निर्माण झाला ,मेंदूत करंट निर्माण झाला … मनात झण झणित आनंद लहरी उठल्या आणि कानशिले गरम होवून तोंडाला पाणी सुटले की समजावे -बात बन गयी है !

'तिखट मिसळणे ' हा उत्सवच असतो. हा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी बटाटे वडे करण्याची नवी प्रथा मी आमच्या 'बिडकर ' घराण्याला सुरु करून दिली आहे !

वडे संपला कि कांदा लसूण मसाला करायला घ्यायचा आणि तो संपत आला कि वडे तळायला घ्यायचे !

क्या स्वाद है जिंदगी का !


 क्या स्वाद है जिंदगीका !

Monday, March 18, 2013




सी एम ई  आणि  मी !


वैद्यकीय क्षेत्रात एकदा ' डाकदर ' झाले कि आयुष्यभरचे शिक्षण झाले असे मानले जात नाही . सतत नव्या तंत्राचा अभ्यास करत राहावा लागतो . तशा काही परिषदा होतात . त्यांना सीएम ई म्हणतात . ' कनटीन्युईन्ग मेडिकल एजुकेशन ' ! काही   सी एम ई ना मी माध्यम संयोजक म्हणून उपस्थित राहिलो आहे . पत्रकारिता आणि जनसंपर्क या क्षेत्रात सुधा अशी सी एम ई असावी असे मला वाटते . नुसते वाटत नाही तर जिथे प्रशिक्षण घेण्याची  संधी मिळेल तिथे  मी हे  प्रशिक्षण घेतो देखील . (मार्केडय काटजू यांनी पत्रकारितेचे प्रशिक्षण अनिवार्य करण्याचे सुतोवाच केले आणि गदारोळ उठला होता . प्रत्यक्षात कोणत्याही शिक्षणाला कमी लेखू नये . सतत  शिकत राहावे . ज्ञान अद्ययावत करत राहावे . मी बी  एस्सी (डीष्टीन्क्षण ) ,डिप्लोमा इन कम्म्युनिकेशन अंड जर्नालिझम ( त्या वर्षी  सर्व प्रथम,कुलपती पुरस्कार ) असे शिक्षण  आणि पत्रकारितेतील  ३  नोकऱ्या झाल्यावर मराठीतून एम ए केले . (पुणे विद्यापीठ,प्रथम वर्ग  )

 नंतर पी एच  डी करण्याचा माझा बेत पुणे विद्यापीठाच्या जालीम प्रवेश परीक्षेने हाणून पाडला !

तरी वाटते अजून नवीन काही शिकावे . म्हणून प्रसार माध्यम -जनसंपर्क -ब्रेन्ड मेनेज्मेंत क्षेत्रात काही कार्यशाळा ,परिषद असेल तर  सी एम ई म्हणून शिकायची माझी तयारी असते . त्याला मी कनटीन्युईन्ग माध्यम एजुकेशन ( सी एम ई ) असे नाव दिले आहे !

चित्रपट निर्मिती क्षेत्र कळावे म्हणून मी चित्रपट निर्मिती विषयावरची सर्तीफिकेट कोर्स प्रमोद प्रभुलकर यांच्या अकादमीत पहिलाच वर्षी केला होता . चित्रपट निर्मितीमधील बारकावे त्या ७ दिवसात मस्त शिकायला मिळाले होते .
२ ० १ २ मध्ये विख्यात ब्रांड गुरु अलेक पदमसी यांच्या पुण्यातील कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली . अलेक यांच्या 'डबल  लाइफ  ' या पुस्तकाची मी अक्षरश पारायणे केली आहेत . त्यातून मला एड अजेन्सी ,जाहिरात ,जनसंपर्क  आणि त्या  क्षेत्राबद्दल जे शिकायला मिळाले ते  इतरत्र कोठेच उपलब्ध नाही . मार्च २ ० १ २ मध्ये  मी अलेक पदमसी यांच्या कार्यशाळेत सहभागी झालो . अलेक यांना कधी आयुष्यात पाह्यला मिळेल असेही मला वाटले नव्हते ! अलेक तेव्हा त्याच्या क्लायंत कंपन्यांना देव  वाटायचा .
कार्यशाळेचा ' बातमी सारांश '
'विश्वासार्हता हेच 'ब्रांड ' चे दुसरे नाव आहे असे मत प्रख्यात 'ब्रांड गुरु ,जाहिरात गुरु ' अलेक पदमसी यांनी  व्यक्त केले.अल्लाना इंस्तीतुत ऑफ मनेजमेंट सायन्स तर्फे आयोजित 'ब्रांड -जाहिरात ' या विषयावरील अंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

अलेक पदमसी पुढे म्हणाले ' भारतात हजारो ब्रांड तयार होत असले तरी हि मोठी प्रक्रिया असून त्यात विश्वासार्हता निर्माण करावी लागते.विश्वासार्हता हेच 'ब्रांड ' चे दुसरे नाव आहे.जाहिरातीच्या कल्पक उपयोगाने ब्रांड तयार होतो ,मात्र जनतेच्या स्मरणात तो राहण्यासाठी त्यातील मनोरंजन,संगीत ,प्रेरणा आणि उपयुक्तता या गोष्टी उपयुक्त ठरतात.जाहिरात तयार करताना चांगल्या कल्पना बाबत आग्रही राहायला हवे '

कोणतीही नकारात्मक गोष्ट जाहिराती मधून मांडलेली जनतेला रुचत नाही.त्यामुळे उपदेशाच्या फंदात न पडता ,ग्राहकांना विचार करायला भाग पाडणे आणि निर्णय त्यांच्यावर सोपवणे अधिक उपयुक्त ठरते असे त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले.प्रभावी जाहिरात तयार होण्यासाठी ग्राहकांना,विचार करायला उद्युक्त करणे संप्रे ष्णा च्या दृष्टीने महत्वाचे ठरते. 
 प्रल्हाद ककर यांची कार्यशाळा भारतातील जाहिरात उद्योग हा जगातील सर्वोत्तम जाहिराती तयार करतो . या जाहिराती सर्वोत्तम होतात कारण भारतातील जाहिरात निर्माते त्यात उत्तम आशयवृद्धी करून गुणवत्तेची भर घालतात . उत्पादनाच्या संदेशात गुणवत्ता वृद्धी करणे म्हणजे जाहिरात होय ' असे प्रतिपादन आज प्रसिद्ध 'एड गुरु ' (जाहिरात  गुरु ) प्रल्हाद ककर यांनी केले .

तरुणांनी नव्या स्वप्नांचा शोध घेवून ,चाकोरी मोडून धाडसी जीवन जगण्याचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले 

महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एजुकेशन सोसायटीच्या अल्लाना इंस्तीत्युत ऑफ मेनेजमेंत सायन्सेस ' च्या वतीने आयोजित 'मिलान्ज ऑफ ब्रान्डीन्ग आयडीयाज ' या कार्यशाळेत ते बोलत  होते . व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी ,प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले होते . प्रल्हाद कक्कर यांनी मार्गदर्शन केले .


अभिव्यक्तीची कोणतीही भाषा नसते ,धाडसाला सीमा नसते !:
प्रल्हाद  ककर 

,' निर्मितीची  आणि विचाराची पारंपारिक चौकट ,नियम मोडणे  हे जाहिरात क्षेत्रात आणि जीवनातही यशस्वी होण्यासाठी आवश्यक असते . परिस्थिती सतत बदलत असल्याने जुने नियम  मोडून नवे प्रस्थापित करण्याची गरज असते . नवे घडविताना बंन्ड करण्याची आवश्यकता असते. मात्र हे बंड करताना विषयाची आवड ,ज्ञान ,दूरदृष्टी आवश्यक असते .

तरुणांनी व्यवस्थापन शास्त्र शिकून मोठ्या कंपन्यात नोकर होण्यापेक्षा  उद्योजक होण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे . त्यामुळे नव निर्मिती करण्याची ,संघर्ष करण्याची आणि खरे समाधान मिळविण्याची संधी मिळते .
 जाहिरात  हा स्वप्न निर्मिती चा व्यवसाय  असून त्यात नव्या कल्पना शोधणे ,धाडस करणे आणि निर्णय क्षमता असणे आवश्यक असते . कष्ट घेतल्याशिवाय यशाचे नंदनवन दिसत नाही .


आता  मला प्रल्हाद ककर यांच्या बाबतीत काय भावले ते सांगतो . !

प्रल्हाद  ककर यांची प्रतिमा माझ्या मनात एक अत्यंत यशस्वी आड फिल्म मेकर अशी होती पण मैत्रिणीच्या घोळक्यात असलेले ,सिगार ओढणारे 'प्रस्थापित  ' अशी होती . अलेक हे गुरु तर प्रल्हाद  ककर हे यशस्वी बंडखोर असे मला वाटत असे . पण पांढरी लुंगी ,झब्बा ,वाढलेली दाढी आणि रुळणारे केस ,चेहऱ्यावर सतत मंद स्मित  हे पाहून मला ते आधुनिक ऋषी वाटू लागले . त्यांनी मांडलेले विचार हे बंडखोर तत्वज्ञा  पेक्षा  काही कमी नव्हते .

या कार्यशाळेत  त्यांनी त्यांना आवडलेल्या जाहिराती (फिल्म ) दाखवल्या . त्यात हि सर्व  फिल्म त्यांच्याच दाखवता आल्या असत्या ,पण इतर आड मेकर्स प्रसून पांडे यांच्या फिल्म्स पण दाखवल्या . माझे बँक अकौंट नाही .मी पैशाला स्पर्श हि  करत नाही .  जे पैसे मिळतील ते मी बायकोच्या स्वाधीन करतो . माझ्या स्वताच्या खर्चासाठी  मला अजून काही असाइन्मेन्त कराव्या लागतात ! जे पैसे मिळतात  ते आम्ही पार्ट्यांवर खर्च करतो असे बिनदिक्कत त्यांनी सांगितले . तरुण मुले माझ्या ऑफिस मध्ये शिकायला येतात त्यांच्यावर मी खर्च करतो आणि आज जाहिरात इंडस्ट्री मध्ये ६ ० टक्के मुले आमची आहेत .
पुण्यात फर्गसन कॉलेज ला मी शिकत असताना माझी खोली हि लोकमान्य टिळक यांनी वास्तव्य केलेली खोली होती ,तिच्या जवळ होती . माझ्या  खोलीत त्या वेळी नॉन वेज मिळत असल्याने तिथे वर्दळ असायची . फर्गसन त्यावेळी ब्राह्मणी ठसा असलेले महाविद्यालय असल्याने त्यांना हे चालणे शक्य नव्हते. अखेर मला होस्टेल मधून काढून टाकण्यात आले ! म्हणून मी पुणेकर च आहे . Reputation Follows you,wherever you are !
माझ्याबरोबर सिद्धोजीराव शितोळे फर्गसन ला होते . ते आता अध्यात्मिक गुरु झाले आहेत . त्या  वेळी माझे टोपण नाब्व रोबिन होते . पुणे विद्यापीठात मला  सामरिक  विभागात चांगले शिकायला मिळाले . मेजर जनरल  परांजपे हे प्राध्यापक  होते . ते संथ सुरात बोलायचे . एम  बी ए पेक्षा चांगले शिक्षण तेथे मिळाले . कारण मार्केटिंग हे एक  युद्धच असते . Art of War ! महाभारतात कृष्ण अर्जुनाला युद्धासाठी उद्युक्त करत असतो . हे  अध्यात्मिक संभाषण नाही तर व्यवस्थापनाचे मार्गदर्शन  आहे  ! You Must Win,There is no going Back !

रॉबिन ते प्रल्हाद कक्कर हा प्रवास तसा योगायोगा नेच झाला .इकडे  तिकडे काम करत असताना चांगली मैत्रीण असेल तरच मी नोकरी स्वीकारत असे ! 


नियमांचे पुस्तक आपण फेकून दिले पाहिजे . चौकटीच्या बाहेर जाउन विचार केला पाहिजे . नवा ,फ्रेश विचार करायला शिकले पाहिजे . नियम -चौकटी मोडायला शिकले पाहिजे . नियम मोडणे हे उत्क्रांतीत  सतत घडत आले आहे . Dissent is Allowed ! Its yard stick.दुसऱ्या कोणाही पेक्षा तुम्हाला नियम अधिक चांगल्या रीतीने मोडता आले पाहिजेत . तसे घडले आणि तुम्ही यशस्वी झालात तरच तुम्हाला नियम मोडल्याची कोणी शिक्षा करणार नाही ! जुने नियम मोडा पण स्वताचे नियम तयार  करा .
बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे असे आपण म्हणत असतो . पण बदल अंगीकारणे हि सोपी गोष्ट नसते . जुन्या पिढीला बदल अजिबात  आवडत ,रुचत नाहीत . आपल्या सुरक्षित चौकटीच्या बाहेर जाउन पाहिले पाहिजे . जुन्या पिढीला बदलाशी जोडून घेणे अवघड वाटत असे . वयाच्या ५ ० वर्षानंतर मन बदलण्याची  प्रक्रिया थांबते . बदलाला मन विरोध करू लागते . बड्या  कंपन्यांचेही तसेच असते ,त्याही बदलला तयार नसतात . अशा वेळी धाडसी व्हावे लागते . बदल का ? बदल  हा फक्त बदल म्हणून घडवायचा नसतो . दूरदृष्टी ,आवड ,ज्ञान यासह बदल  आणि बंड करावे लागते .
बंडाची स्वताची एक पद्धत असते . ती करून पहा . 'असे केले तर काय होईल ,तसे केले तर काय होईल ' असा  फार विचार करत बसू नका …
नोकरी करणे आणि साडेपाच वाजण्याची वाट पाहणे यात काही मजा नाही . स्वताचा व्यवसाय  करणे ,त्यासाठी पंख पसरून झेप घेण्याचे धाडस करणे यात मज आहे . गोव्यात मी पाहिले कि आठवड्यातून  एकदाच मिळणाऱ्या ठिकाणी एक जण मासेमारी करीत  असे .सकाळी  १ पासून तो मस्त ताडी पिउन मासेमारी करीत असे.  रोज मासे पकडले   तर ज्यास्त पैसे मिळतील असे सांगितल्यावर तो म्हणाला . असे केले तर ते मासे लवकर संपून जातील आणि आठवड्यातून एकदा मासेमारी करून जे पैसे मिळतात त्यातून रोज पैसे मिळवून  मला माझी जगण्यातील ,उरलेल्या दिवसात मौज करण्याची गम्मत घालवायची नाही . !
गोव्याची जीवन संस्कृती अशी आहे . ते मस्त  मासेमारी  करतात  ,दारू पितात,गाणी  गातात , त्या नंतर  दिसेल  त्या महिलेवर  प्रेम करतात . ! एक  दिवस  मौज करण्यासाठी  सहा दिवस घड्याळ्याच्या काट्याकडे पाहत  काम  करण्याची संकल्पना  त्यांना  मान्य  नाही . आपली  संस्कृती हि जीवनातील गुणवत्ता पाहणारी संस्कृती  नसून गुलाम गिरीची संस्कृती आहे . त्यामुळे नोकरीत रस वाटतो . साडे पाच  वाजता  सायंकाळी  आपले आयुष्य  उत्साहाने सुरु होते का ? रोज सकाळी उठल्यावर आपले आयुष्य उत्सहाने सुरु झाले पाहिजे . आज आयुष्य आपल्याला नवीन काय देणार आहे याचा उत्साह वाटला पाहिजे !

माष्टर व्हायचे कि नोकर व्हायचे हे ठरवले पाहिजे . अन्त्रप्रुनर झाले पाहिजे . ट्रेडर होवू नका . ट्रेडर हा कमिशन वजा करत असतो ,तर   अन्त्रप्रुनर हा आपल्या योगदानातून कामाची व्हेल्यू (गुणवत्ता ) वाढवत असतो . व्हेल्यू निर्माण करत असतो । 


सेटल्ड ' होणे हा एक असाच भ्रम  आहे . तो बदलाला नाकारत असतो . कार्पोरेट जगात अपयश ढकलण्यासाठी कोणी तरी  'पात्र ' तयार  केले जाते . अपयश त्याच्यावर ढकलले  जाते . संशोधन आपल्या उपयोगी पडतेच असे नाही . बर्याच दा ती एक सोय असते . आपल्याला निर्णय घेताना धोका पत्करावा लागतो .कोणतेही निर्णय हे चुकीचे निर्णय नसतात . इतर लोक जे निर्णय घेवू शकत नाहीत ,ते तुम्हाला घेता आले पाहिजेत .  घोड्यांची शर्यत हे 'मार्केट ' चे उत्कृष्ट उदाहरण आहे . Dont be ' also Ran '  ! फक्त शर्यतीत भाग घेवून उपयोगी नाही ,जिंकणे गरजेचे आहे . शिखर चढाई करत असताना शिखराच्या बेस केम्प वर जाऊन पाय  दुखताहेत म्हणून परत फिरण्यात अर्थ नसतो . वाटेल ते झाले तरी चालेल पण मी शिखर पादाक्रांत करेनच असा चंग बांधला पाहिजे ,


आभाळात विहार करण्याचा आनंद हा फक्त जे झेप घेवू शकतात तेच जाणू शकतात .
म्हणून श्रद्धा आणि पूर्ण आत्मविश्वासाने निर्णय घेता आले पाहिजेत .
मी लक्षद्वीप जवळ बेटावर स्कुबा डायव्हिंग स्कूल सुरु  केले  आहे .ते मी सतत तोट्यात  चालवत  होतो . ब्रेक इव्हन ला जायला ८ वर्षे लागली  !तेथे जायचे तर मुंबई  ते कोचीन विमानाने जावे लागते ,नंतर अगाती पर्यंत जावे लागते आणि अगति ते बेटापर्यंत मासेमारी इंजिन बोटीच्या 'डग  डग डग ' आवाजात ८ तास प्रवास करावा लागतो . शु '
 करण्याची पण सोय नसते ! माशांचा वास येत असतो . अशा वेळी  या छोट्या बोटीत प्रवास करणे धोक्याचे आहे असे  आईचे म्हणणे आहे असे सांगणे ,किवा आपण हेलीकोप्तर ने जाऊ शकत नाही असे विचारणे मूर्ख पणाचे असते .
आपण अनोळख्या बोटीतून निघालो आहोत . आपल्याला काही नवीन अनुभव मिळेल ,
काही नवीन दिसेल ,बोट उलटली तरी नवे काही अनुभवता येईल अशी मानसिकता असली पाहिजे
काही वेळा नंदनवना पर्यंत जायला पण नरकातून जावे लागते . !


स्कुबा  डायव्हिंग चा अनुभव हा अविस्मरणीय असतो . तेथे हर घडी तुम्हाला समुद्र काही वेगळे दाखवत असतो . समुद्र जर काही महत्वाचे शिकवत असेल तर ते समानता आणि आदर ! तो भीती घालवायला शिकवतो . भीतीतून बाहेर यायला शिकवतो . आपला अहंकार समुद्रात विरघळून जातो . तो आपल्याला जोखीम घ्यायला शिकवतो . आपल्याला अनोळखी प्रांताची भीती वाटते . हि भीती समुद्र घालवतो !समुद्र हा मी घेतलेला आयुष्यातील एकमेव अध्यात्मिक अनुभव आहे .

भारतीय जाहिरात उद्योग हा वेगाने वाढणारा उद्योग आहे . आशयाच्या आधारे गुणवृद्धी करणे हे भारतीय जाहिरात उद्योगाचे वैशिष्ट्य आहे . आपण त्यामुळे सर्वोत्कृष्ट जाहिराती (कमर्शियल ) बनवतो .
जाहिरात उद्योग हा स्वप्नांचा व्यवसाय आहे . Dream at Bill ! Dream at will !असे मी म्हणतो . लोक मला स्वप्न पाहण्यासाठी पैसे देतात . जाहिरात उद्योग हा उद्याबद्दल बोलतो . तो आशेबद्दल बोलतो . त्या क्षणापुरते जेव्हा जाहिरात पाहून दर्शकाचे मन आपण बदलतो ,मत परिवर्तन करतो . तेव्हा आपण जिंकलेलो असतो  !आपण जाहिरातीमध्ये आशयाच्या आधारे गुणवत्ता वृद्धी करीत असतो .
त्यासाठी जाहिरातीची भाषा कोणती आहे ,तिच्यात कोणी काम केले आहे ,हे महत्वाचे नाही. अनेक माझ्या जाहिराती आणि
इतरांच्या आवडत्या जाहिराती मी सांगू शकेन .  पण मला आवडते ती मुकबधीर विद्यार्थ्यांनी केलेली राष्ट्रगीताची जाहिरात . ज्यात साईन लेन्ग्वेज मध्ये ,खाणाखुणांच्या भाषेत ते राष्ट्रगीत म्हणतात ! हीच जाहिरात  माध्यमाची ताकद आहे .

' अभिव्यक्ती कि कोई भाषा  नही होती !

Tuesday, March 12, 2013

सेरेब्रल पाल्सी ' म्हणजे 'बहुविकलांगता ' . या विकारात माणसाचे अनेक अवयव काम करत नाहीत . आणि चालणे -फिरणे बंद होते. तरी जिद्दीने राज्य आयोगाची परीक्षा देवून उत्कर्षा मोहिते हि साताऱ्याची युवती सेल्स टेक्स इन्स्पेक्टर झाली आहे . ! सकाळ टाईम्स ' मध्ये ही बातमी वाचली . आणि साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या अध्यक्ष आड . वर्षा माडगुळकर यांना उत्कर्षाच्या यशाची कहाणी सांगितली . बँकेच्या वतीने त्या उत्कर्षाचा सत्कार करणार आहेत . हि बातमी लिहिणारे श्रीकांत कात्रे हे माझे साताऱ्यातील जुने -जाणते सहकारी आहेत . त्यांचेही अभिनंदन केले . सकारात्मक बातम्यांनी समाजातील सकारात्मकता वाढीस लावणे हे आपले सर्वांचे काम आहे

Sunday, March 10, 2013

संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त आज 'जनवाणी ' ने पुण्यातील ७ प्रभागात स्वच्छता जन जागरण मोहीम आयोजित केली होती . मी ढोले पाटील रस्त्यावरील महात्मा फुले शाळेत कार्यक्रमाला गेलो. सर्व मुले झाडू घेवून स्वच्छता करू लागले … कार्यक्रमाला आलेल्या नगरसेविका वनिता वागस्कर यांना मी विनंती केली कि मुलांबरोबर आपण सुद्धा झाडू हाती घ्याल का ? आणि त्यांनी माझी विनंती सहजपणे ऐकली देखील .( मी त्या ठिकाणी असल्याचा तेवढाच उपयोग )
ज्या वाटेवर गेलो ,तिथे तुझी भेट नाही
ज्या शिवारात हिंडलो ,तिथे तुझे शेत नाही
रण रणत्या उन्हात ,तुझ्याकडे जाणारा एकही मेघदूत नाही
दिसले हजारो चेहरे ,एकातही तुझे रूप नाही !
कोमसाप ' आणि 'पनवेल टाईम्स '(संपादक गणेश कोळी ) आयोजित पोपटी कवी संमेलन(पनवेल ) साठी प्रमुख पाहुणा म्हणून रविवारी गेलो होतो . पोपटी म्हणजे पाणी न घालता माठात ,शेकोटीवर उकडलेल्या वालाच्या कोवळ्या शेंगा ! त्यात भाम्बुर्डा पाला ,मीठ टाकले जाते. थंडीत हि पोपटी प्रसिद्ध असते . त्यासोबत कवी संमेलन घेण्याची प्रथा पनवेल मध्ये ४ वर्षे प्रचलित आहे. मी पोपटी साठी आणि कविता वाचनासाठी गेलो. प्रमुख पाहुणा म्हणून पोपटीच्या शेकोटीचे प्रज्वलन माझ्या हस्ते झाले … रविवारी मावळत्या वेळी 'धूळ उडवत गायी निघाल्या ' असताना ,नदी काठच्या रस्त्याने ,माथेरान च्या डोंगर रांगा न्याहाळत पोहोचलो .रात्री ' चंद्रचांदणे ',पोपटी आणि कवितांचा आस्वाद . मित्रांचा आपुलकी युक्त सहवास . थोडी फोटोग्राफी ! (प्रमुख पाहुण्यांना आग्रह झाल्याने) मी पण एक कविता सादर केली ! माझ्या भाषणात शंकर सखाराम यांच्या आगरी भागातील कृषी संस्कृती साहित्याचा कृतद्न्य उल्लेख साहजिक होता … एकुणात संस्मरणीय अनुभव
मेंदीच्या पानावर …आता मी जिथे आहे,तिथे भोवताली डोंगर आहेत,,जिथे मी रोज चालायचो,पळायचो ,मध्ये मोठे धरण आहे।तिथे रोज ४ किलोमीटर मी पोहायचो … इथे माझी 12 पर्यंतची शाळा आहे,या शाळेत मी प्रमाणपत्रांचा डोंगर उभा केला होता ,इथे आज जत्रा आहे, तमाशा -जागर आहे,चंद्र आहे ,मी आणि मित्र रात्र रात्र जागायचो ,रात्री चांदण्यात पोहायचो …. इथे मी चित्रकला -मित्रकला शिकलो …. सारे काही भव्य । ७० एम एम केनव्हास ,हि आस इथलीच .इथे ऐकली गाणी जीवाचे कान करून । मैत्रिणींवर झुरलो रात्रंदिन …. इथेच आरत्यांचे धूप भरले श्वास खोलवर घेतले होते आत आत .

जीव लावणे,जीव ओवाळणे … इथे तर शिकलो

इथले दुक्ख -दर्द ठेवलेत लपवून धरणाच्या खाली पाताळात खोल दडवून ….

इथे मी जिंकलो -हारलो. जग जिंकण्याची ईर्ष्या इथली माती पाठीला -छातीला लागल्यापासून आहेच प्रज्वलित ।

इथूनच विस्थापित झालो । बहेर जाउन प्रस्थापित झालो

आज इथेच असायला हवे . आपण कुठे जाउन पोहोचलो ,यापेक्षा आपण कुठून आलो हे महत्वाचे …. बहुधा
गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ! :

संगीत नाट्याची कीर्ती ध्वजा तळपत ठेवणाऱ्या कीर्ती शिलेदार या गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत . त्यांची मुलाखत विद्यार्थी संपादक या नात्याने मी १ ९ ९ ५ साली कोलेजच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित 'आगम ' या नियतकालिकात घेतली होती . त्यानंतर आज महिला दिनी भेट झाली . ती देखील डॉ .सतिश देसाई अध्यक्ष असलेल्या नाट्य परिषदेने पद्मश्री जयमाला शिलेदार यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केल्याने झाली .

योगायोग असा कि डॉ .सतिश देसाई हे देखील गरवारे चे माजी विद्यार्थी आहेत. ! त्याच अंकात मी डॉ .सतिश देसाई यांचीही मुलाखत घेतली होती

डॉ .सतिश देसाई हे आजच्या कार्यक्रमाचे संयोजक होते ,कीर्ती शिलेदार या जयमाला ताई बरोबर आल्या होत्या आणि माझ्याकडे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीची जबाबदारी होती .

आणि हा फोटो ज्या प्रिया कुलकर्णी यांनी हा फोटो काढला त्या पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या नात असून त्याही गरवारे कॉलेज च्या माजी विद्यार्थिनी आणि माझ्या सहाध्यायी आहेत

आहे कि नाही माजी विद्यार्थ्यांची गम्मत !

गुलझार च्या हुकलेल्या भेटीची पण कविता होते तेव्हा …

आज गुलझार यांच्या हस्ते अक्षरधारा च्या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन होते . रमेश राठीवडेकर हे जवळचे स्नेही आहेत . त्यांच्या बरोबर राहिलो तर गुलझार यांच्याशी भेटता येईल ,फोटो घेता येईल ,असा विचार सकाळीच मनात डोकावला होता .

तेवढ्यात दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या आणि स्वत दृष्टिहीन असणाऱ्या कार्यकर्त्या सकीना बेदी यांचा फोन आला . त्यांना गुलझार यांना भेटायचेच होते . मला एकदम जबाबदारीचे ओझे वाटू लागले . (वास्तविक राठीवडेकर आणि बेदी दोघेही आमच्या संस्थेच्या पी ए इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी आहेत ) मी राठीवडेकर यांना फोन करून सकीना यांची सपत्नीक भेट गुलझार यांच्याशी घडवून आणता येते का पहा ,अशी विनंती केली .पण कार्यक्रमाच्या गडबडीत असलेल्या राठीवडेकर यांचा स्वर आश्वासक वाटला नाही .

शेवटी मी हि भेट परिस्थितीवर सोडली . भेट झाली नाही तर सकीना यांची होणारी निराशा पाहायला आपण तिथे असू नये ,असे वाटले आणि मी टिळक स्मारक पासून जवळ घरी असून सुधा कार्यक्रमाला गेलो नाही ।

कार्यक्रम संपला आणि सकिना यांचा भावनेने ओथबलेला फोन आला . तेव्हा त्यांचे काम झाले असे वाटून हायसे वाटले . पण खरी गम्मत पुढेच आहे . राठीवडेकर यांनी गुलझार यांच्या उपस्थितीत ५ वाचकांच्या हस्ते ते प्रकाशन केले आणि त्यात सकीना यांचा समावेश केला होता . ! सकीना आणि त्यांचे पती अत्यंत भारावून गेले होते … त्यांचा दिवस संस्मरणीय ठरला होता …

विकेट माझीच उडाली होति. ! माझी आणि गुलझार यांची भेट नाही होवू शकली ,फोटो राहून गेला होता । पण सकीना यांचा सुखद अनुभव ऐकला आणि वाटले कि गुलझार बोलतो तेव्हा'त्याची कविता होते . पण त्याच्या राहून गेलेल्या भेटीची सुद्धा कविता होते ! वाह क्या बात है … ऐ जिंदगी गले लगा ले
घंटा वाजवता येईल का  ?

आज ब्रिटीश संशोधक पुण्याच्या 'हेरीटेज  वॉक  ' मध्ये सहभागी व्हायला आले होते . जनवाणी -आणि पुणे पालिकेच्या या वॉक चे वार्तांकन आम्ही 'प्रबोधन  माध्यम ' च्या वतीने करीत  असतो . घट स्थापनेला सुरु झालेला हा उपक्रम चांगला जोम  धरून आहे . त्यात  अनेक वेगळे अनुभव येत असतात . आज  जे ब्रिटीश संशोधक सहभागी झाले  ते बेलबाग मंदिराजवळ अचानक त्यांच्या एका स्वर्गीय ब्रिटीश  मित्राच्या आठवणीने रडू लागले ! चर्च मध्ये जशी मित्रासाठी  प्रार्थना करता  येते . तसे काही या मंदिरात  घंटा वाजवून करता  येईल  का असे त्यांनी  विचारले . मंदिरात घंटा वाजवून प्रार्थना करतात  ,हे त्यांनी वाचले  होते . (माणसे  शेवटी  माणसे  असतात ,धर्माच्या  भिंती फक्त ओलांडता  आल्या पाहिजेत  )