Tuesday, February 5, 2013

अजून छान 'बर्फ बारी ' होतेय काश्मीर मध्ये ....ऑनलाईन असलेल्या अशीक रेशी या मित्राला म्हटले ' थोडी बर्फ बारी ' इधर भेज दो न ! ' लगेच त्याने घराजवळच्या वाटेचा बर्फ भरला फोटो पाठवला....तो पहिला ,डोळे मिटले ...मन लगेच तिथे गेले.हळुवार पणे हातमोजे घातले ...बर्फात पाय गुडघ्या इतके रुतवले ....बर्फाचा गोळा केला आणि लां...ब फेकला....Miss you Kashmir ,Miss you all !



अब भी अच्छी बर्फ बारी हो रही है काश्मीर मे ! मेरे दोस्त अशिक रेशी ,जो ओनलायीन थे ,उनको कहा :थोडी बर्फ बारी इधर भेज दो ना ! उन्होने तुरंत उनके घर कि राह पार जमा बर्फ का अच्छासा फोटो भेजा...मैने फोटो देखा ,आंखे बंद कि ...मेरा मन अचानक बर्फ कि तिले पर जा पहुंचा ...हात मे हलकेसे ग्लोव्ज पेहने ...फिर बर्फ मे पैर घुटने तक डाले ...हात मे बडा सा बरफ का गोला जमाया ...और दूर ,काफी दूर फेंक दिया....बस ! ......कुछ यादे ,कुछ लम्हे ..कुछ पल ..काश्मीर के ! Miss you kashmir ,miss you all !

मला आवडलेले गाणे परत ऐकताना किमान ५ वेळा तरी ऐकतो...प्रत्येक चाल,सुर्,वाद्य ....लकेर मनात बसेल इतपर्यंत ऐकतो.त्या शिवाय ते गाणे मला आवडलेय असे वाटत च नाही ! ..आणि आता ऐकत आहोत त्या पेक्षा आणखी बरया ' सिस्टिम ' मग ते गाणे ऐकावेसे वाटते ....! अगदी ऐकले त्याच सुरात ते म्हणावेसे पण वाटते. म्हणायला जमले ,कि समजते ,' 'चीज ' आवडलीय आपल्याला !

Sunday, February 3, 2013

कशाला उगाच लांबच्या बाता ..
कशाला घोर जीवाला आता..
बोलून टाकू मनातले..
आयुष्यातून जाता जाता .....!
तू मला विसरून जावे
मी तुला आठवून गावे
वळले ते कटाक्ष जरी
जपले खरे ते जीव भावे !

Friday, February 1, 2013

काय भेट देऊ तुला ?

by Deepak Bidkar on Wednesday, October 26, 2011 at 11:08am ·

काय भेट देऊ तुला ?

काय भेट देऊ तुला ? हा दर वर्षी पडणारा प्रश्न...गौरी ला दर वर्षी काही दिवाळी भेट द्यायचे जमतेच असे नाही...गेल्या कित्येक वर्षात तिला साडी देखील घेतल्याचे मला आठवत नाही...असा आमचा न्यारा संसार...दिवाळी अशी तर उर्वरित वर्ष कसे ,याचा अंदाज यावरून यावा..
पण यावर्षी तिला काही भेट द्यायचीच असा चंग मी बांधला होता..

कार्यालयातील सर्वांचा बोनस,वर्षभर ज्यांचे पैसे द्यायचे राहिलेले असतात अशांची दिवाळी ,त्यातच या वर्षी आमचा 'सर्वधर्मीय दिवाळी ' हा जोरदार कार्यक्रम -उपक्रम होता..त्यात जमेल तितक्या सामाजिक,राजकीय,मित्र मडली बरोबर दिवाळी फराळ केला ,खूप समाधान वाटले..
नंतर अनेक कार्यालयातून दिवाळी भेटी देण्याचे दामाव्णारे पण समाधान देणारे काम पूर्ण करत आणले,
काही दिवाळी अंकांना ,दैनिकांना दिवाळीत हि मजकूर लागतो,आमच्या शी संबंधित संस्था,पक्ष यांच्या बातम्या दिवाळी त हि सुरु असतात...मग सुट्टी कुठली मिळायला ?

त्यामुळे दिवाळी हे दर वर्षी संकट वाटते,या वर्षी तसे वाटले...
आणि त्यातून सुखरूप बाहेर पडताना लक्षात आले गौरीला भेट द्यायची राहिली आहेच,
मग दमलेली पावले घेऊन सर्व रस्ता पालथा घातला,पण गौरीला आवडणारी वस्तू...हल्ली बाजारात सहज मिळत नाही हे लक्षात आले,

एका ठिकाणी ती वस्तू मिळाली !
काळा रेडीओ !
गौरी चा आवाज गोड,आकाशवाणीच्या पहिल्या मुलाखतीसाठी ती पुण्यावरून सातारला आली,भर पावसात आम्ही ती मुलाखत दिली ..आणि गौरीचा आवाज सातारा आकशवाणी वर ऐकायला येवू लागला..

नंतर पुण्यात आल्यावर ती पहाटे पुणे आकशवाणी केंद्रावर जाऊ लागली..
घरातील सर्व आवरून ती जायची,तेव्हा खूप समाधानी असायची..,
स्तुदिओ मधील धावपळ,रेकॉर्ड शोधणे,अनाउन्समेंट करणे,खूप हौसेने करायची,
मग आमची न्यूज अजेन्सी सुरु झाली आणि बिचारीला मला मदत करायला आकाशवाणी सोडायला लागली,
त्याची खंत अजून ताजी आहे,

मग जगण्याच्या धबडग्यात आकाशवाणी संच घरातून हरवून गेले,मोबाईल मध्ये आकाशवाणी असून ऐकता येईना..
गौरीची आणि आकाशवाणीची हि ताटातूट दुखः दायक च होती.
आमच्या बिल्डींग खाली इस्त्री वाले मोठ्या आवाजात एफ एम लावत..वाऱ्याच्या लहरींवर ते सूर कानी पडले कि ती ऐकत काम करत असे,
आधी आणलेले छोटे रेदिओ ,टू इन वन कालबाह्य होवून अडगळीत गेलेले...

आणि गौरीची आकाशवाणी ची हौस देखील !

...मला त्या दुकानात दिसलेला काळा फिलिप्स चा रेडीओ पाहून मला सारे आठवले..!
घरी आल्यावर डोळे मिटायला लाऊन मी तो गौरीच्या हातात दिला..

भेट काय देऊ तुला ? हा प्रश्न सुटला..आणि दोघांच्याही डोळ्यात पाणी तरारले ...