रविवार सरला तरी त्याच्या स्मृती सोमवारी रेंगाळत राहतात ..
जर रविवारी आपण अशा वेगळ्या गोष्टी केल्या कि ज्या आठवडाभर करता येत नाहीत ,तर तो नक्की संस्मरणीय होतो .
मला खूप रविवार नंतर अशी संधी होती . त्या साठी शनिवारी रात्री ' भाग मिल्खा भाग ' सहकुटुंब पाहिला . ' मटार भात ' हि शनिवार रात्रीची 'आपली आवड ' असल्याने आदित्य ने त्यावर ' भात मिल्खा भात ' अशी कोटी केली ! ( पोरगा हुशार आहे )
सर्व रविवारीय वृत्तपत्रांच्या पुरवण्या वाचून काढल्या . बाल्कनी तून दिसणाऱ्या भव्य मैदानात रविवारी भरणारा साप्ताहिक ' भव्य क्रिकेट महोत्सव' पाहिला ! घरात मदत केली . डोक्याला भरपूर तेल लावले . . देवीच्या घटाला लागणारी तिळांच्या फुलांची माळ तयार केली .. आणी गौरी साठी सकाळी चहा केला ! दीड महिना मला टी व्ही पाहिला मिळाला नाही . मी हिस्टरी चनेल पाहून ती हौस पूर्ण केली . 'घर ' या विषयावरील सुंदर साप्ताहिक मालिका हिस्टरी वर सुरु आहे . त्यात काल विनय पाठक ने वहिदा रेहमान यांना त्यांच्या पूर्वजांच्या घरी -गावी नेवून स्मृतींच्या हिंदोळ्यावर नेले . . डोळ्यात अश्रू आणले .
गोविंद निहलानींची 'तमस ' मालिका पाहिली . उर्मिला पवार यांचे 'आयदान ' वाचून पूर्ण केले . आदित्य चा अभ्यास घेतला . . ( आणी भरपूर झोप घेतली . . हळीवांचे लाडू खावून ! )
थोडे संगीत ऐकले असते आणी पेंटिंग -फोटोग्राफी केली असती तर हा रविवार सुवर्णाक्षराने लिहावा लागला असता
पण असा रविवार चांगला गेला कि तो मला टोचतो ,लगेच व पु किवा जयवंत दळवींच्या रविवार वरील एका कथेची आठवण होते . . त्यात असोशीने रविवार ची वाट पाहणाऱ्याचा रविवार कसा कामे अंगावर घेवून संपून जातो ,हे प्रत्ययकारी लिहिले होते ! माझे अनेक रविवार असे कामात उडून जातात . .
कालच्या सारख्या अशा रविवारीय संगीत सभा /वाचन सभा /कौटुंबिक सभाच हा दिवस अविस्मरणीय करतात . .
. . . . संडे कब आयेगा ?
No comments:
Post a Comment