Sunday, March 10, 2013


गुलझार च्या हुकलेल्या भेटीची पण कविता होते तेव्हा …

आज गुलझार यांच्या हस्ते अक्षरधारा च्या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन होते . रमेश राठीवडेकर हे जवळचे स्नेही आहेत . त्यांच्या बरोबर राहिलो तर गुलझार यांच्याशी भेटता येईल ,फोटो घेता येईल ,असा विचार सकाळीच मनात डोकावला होता .

तेवढ्यात दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या आणि स्वत दृष्टिहीन असणाऱ्या कार्यकर्त्या सकीना बेदी यांचा फोन आला . त्यांना गुलझार यांना भेटायचेच होते . मला एकदम जबाबदारीचे ओझे वाटू लागले . (वास्तविक राठीवडेकर आणि बेदी दोघेही आमच्या संस्थेच्या पी ए इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी आहेत ) मी राठीवडेकर यांना फोन करून सकीना यांची सपत्नीक भेट गुलझार यांच्याशी घडवून आणता येते का पहा ,अशी विनंती केली .पण कार्यक्रमाच्या गडबडीत असलेल्या राठीवडेकर यांचा स्वर आश्वासक वाटला नाही .

शेवटी मी हि भेट परिस्थितीवर सोडली . भेट झाली नाही तर सकीना यांची होणारी निराशा पाहायला आपण तिथे असू नये ,असे वाटले आणि मी टिळक स्मारक पासून जवळ घरी असून सुधा कार्यक्रमाला गेलो नाही ।

कार्यक्रम संपला आणि सकिना यांचा भावनेने ओथबलेला फोन आला . तेव्हा त्यांचे काम झाले असे वाटून हायसे वाटले . पण खरी गम्मत पुढेच आहे . राठीवडेकर यांनी गुलझार यांच्या उपस्थितीत ५ वाचकांच्या हस्ते ते प्रकाशन केले आणि त्यात सकीना यांचा समावेश केला होता . ! सकीना आणि त्यांचे पती अत्यंत भारावून गेले होते … त्यांचा दिवस संस्मरणीय ठरला होता …

विकेट माझीच उडाली होति. ! माझी आणि गुलझार यांची भेट नाही होवू शकली ,फोटो राहून गेला होता । पण सकीना यांचा सुखद अनुभव ऐकला आणि वाटले कि गुलझार बोलतो तेव्हा'त्याची कविता होते . पण त्याच्या राहून गेलेल्या भेटीची सुद्धा कविता होते ! वाह क्या बात है … ऐ जिंदगी गले लगा ले

No comments:

Post a Comment