कोमसाप ' आणि 'पनवेल टाईम्स '(संपादक गणेश
कोळी ) आयोजित पोपटी कवी संमेलन(पनवेल ) साठी प्रमुख पाहुणा म्हणून
रविवारी गेलो होतो . पोपटी म्हणजे पाणी न घालता माठात ,शेकोटीवर उकडलेल्या
वालाच्या कोवळ्या शेंगा ! त्यात भाम्बुर्डा पाला ,मीठ टाकले जाते. थंडीत
हि पोपटी प्रसिद्ध असते . त्यासोबत कवी संमेलन घेण्याची प्रथा पनवेल
मध्ये ४ वर्षे प्रचलित आहे. मी पोपटी साठी आणि कविता वाचनासाठी गेलो.
प्रमुख पाहुणा म्हणून पोपटीच्या शेकोटीचे प्रज्वलन माझ्या हस्ते झाले …
रविवारी मावळत्या वेळी 'धूळ उडवत गायी
निघाल्या ' असताना ,नदी काठच्या रस्त्याने ,माथेरान च्या डोंगर रांगा
न्याहाळत पोहोचलो .रात्री ' चंद्रचांदणे ',पोपटी आणि कवितांचा आस्वाद .
मित्रांचा आपुलकी युक्त सहवास . थोडी फोटोग्राफी ! (प्रमुख पाहुण्यांना
आग्रह झाल्याने) मी पण एक कविता सादर केली ! माझ्या भाषणात शंकर सखाराम
यांच्या आगरी भागातील कृषी संस्कृती साहित्याचा कृतद्न्य उल्लेख साहजिक
होता … एकुणात संस्मरणीय अनुभव
No comments:
Post a Comment