- .सातारा ,एम रमजू ,फोटोंचा धूर . ,अश्रू आणि मी !
सातारा सोडला … उसको बहोत साल हुए । साताऱ्यात जी आश्चर्ये पाहिली ,त्यात एम रमजू (फोटो ग्राफर) हे एक आश्चर्य होते . एस टी वर्कशोप मध्ये काम करणाऱ्या या माणसाचा डोळा क्यामेरयाला लागला आणी जणू चमत्कारच झाला . बाळासाहेब देसाई ते बाळासाहेब ठाकरे असा कॅनवास त्यांनी लीलया पेलला . आयरिश स्कॉलर सारखे उंच ताडमाड ,डीसेण्ट आणी ऋजू व्यक्तिमत्व असलेले रमजू बघता बघता सातारकर पत्रकारांच्या गळ्यातील ताईत बनले . हि आख्यायिका १ ९ ६ ० सालापासूनची आहे . आज रमजू ७ ३ हून अधिक वयाचे आहेत .
सातारा जिल्ह्यात अपघात झाला तर यमाआधी त्याची खबर रमजू ना लागायची !
रमजू हातातील काम सोडून अपघात स्थळी पोहोचायचे . . फोटो काढून ऐक्य पासून इतर सर्व नव्या पेपर ला पोहोचवायचे . नवा -जुना भेदभाव न करता . अशा खबर मिळवायचे त्यांचे खास नेटवर्क होते . अपघात हा बीट त्यांनी पत्रकार नसताना एक हाती सांभाळला .
तेव्हा डिजिटल प्रकार नव्हता . रमजू अचूक फ्रेम द्यायचे . उपसंपादक -संपादकांची टाप नसायची त्यांच्या फ्रेम पुढे 'इमेजीन ' करायची !
स्वच्ह दाढी करून ,सुंदर कपडे घालून ,लाल बुंद रमजू ,स्कूटर ताबडत कुठे कुठे फोटो काढत फिरायचे . . किती बिले निघायची . . हे देव ,पेपर आणी रमजुना माहित असायचे . . साऱ्या गोष्टी त्यांच्या डार्क रूम मध्ये बंदिस्त !
रमजूंची ची स्कूटर पिवळी झार रंगाची असायची . गर्दीत कोठेही ,कोणीही ओळखून आपल्याला 'मिशन ' साठी मार्ग काढून द्यावा ,यासाठी असलेली हि त्यांची युक्ती . कधी तरी त्यांनीच सांगितलेले . ( आता पीय़ाझीओ पासून कोणतीही पिवळी गाडी दिसली कि रमजूंची आठवण हमखास ! )
माहिती कार्यालयाचे दौरे ,राजकीय सभा ,पूर ,अपघात ,भूकंप . . त्यांना काहीच वर्ज्य नसायचे . . साताऱ्यात ,बाळासाहेब देसाई . . राजमाता सुमित्राराजे भोसले . . इथपासून प्रतापराव भोसले ,नरेंद्र दाभोलकर असण्याचा काळ तर त्यांचाच होता .
पण ,अभयसिंहराजे भोसले ,शिवेंद्र राजे ,मदन भोसले ,उदयन राजे ,शंभूराजे देसाई ,वगेरे काळ पण त्यांचाच होता .
एकदा ,सोनिया गांधींची भोर मधील सभा 'कव्हर ' करायला मदन भोसले यांच्या वतीने रमजू आणी मी दोघेच गेलो . . पावसात झालेली सभा . . महाराष्ट्रातील पहिली सभा . ,. इरकली साडी नेसलेल्या सोनियांना 'फ्रेम बद्ध ' करण्यात रमजुनी काय बाजी लावली ,हे पाहिले !
रमजू कोणत्याही विचारांचे नव्हते . . पत्रकारांचे दोन गट पडले तरी रमजू कोणत्या गटात टाकून त्यांना धर्म संकटात टाकू नये ,अशी दोन्ही गटांची इच्छा असायची .
रमजू हा एक डोळा होता . . त्यांच्या ' फ्रेम ' मधून काहीही न सोडणारा . .
पत्रकार 'श्रम परिहार ' करत असले कि ,पोरांचा दंगा पाहणाऱ्या कृतार्थ बापासारखे स्थितप्रद्न्य असायचे ते . . कोणत्याही पेल्यात -गोटात ते नसायचे . . खूप कमी बोलायचे . . त्यांना काय बोलायचे होते . . हे त्यांचे फोटो पाहिल्यावर कळायचे !
गेले काही महिने त्यांची आठवण येत होती . . मी चौकशी करीत असायचो . . साताऱ्यातील 'तिसरा राजा ' असलेला माझा पत्रकार मित्र राजेंद्र त्रिगुणे चे एक दिवस (परवाच ) सटासट मिस कॉल आले . . उत्साहाने भरलेला 'राजा ' म्हणाला ,'मी रमजू कडे आलो आहे ,
बोला ' त्यांच्याशी !
डोळे लकाकले ! लेक टेपिंग -जिलेटीन स्फोट -राजकीय हत्या सारे 'सीन ' डोळ्यासमोर उभे राहिले . . या साऱ्यात स्वताची काहीच भूमिका ,मत नसलेले पण इतिहास प्रामाणिकपणे फ्रेम बद्ध ' करणारे रमजू ,अगदी लाल बुंद डोळ्यासमोर उभे राहिले !
त्यांच्याशी काय बोललो कळलेच नाही .
बाहेर आल्यावर राजा ' ने सांगितले . रमजू रिटायर झालेत . . मागेच त्यांनी बर्याच फोटो आणी फिल्म्स त्यांनी जाळून टाकल्यात . .,सलग १ ५ दिवस हि 'जाळ पोळ ' चालू होती . . प्राण पणाने ,जीवाची बाजी लावून काढलेले किती तरी फोटो भस्मसात झाले असणार . . किती शिल्लक आहेत हे विचारायचे धाडस अंगात नाही माझ्या . .
दिसतोय तो फक्त धूर . . आणी रमजू चा लाल बुंद चेहरा . . कदाचित कोणाच्याच क्यामेरयात न आलेला . .
Monday, July 8, 2013
दिसतोय तो फक्त धूर . .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment