आठव कथा :चिकणमाती चा बेंदूर … तो बेंदूर !
-----------------------------------------------
मस्त झिम्माड पाऊस पडतोय .
अशा आषाढी पावसात कुठे असायला हवे होते माहिताय ?
जावळीच्या डोंगरात ,पाचगणीच्या पायथ्याशी असलेल्या आमच्या आजोळी खर्शी ला आणि हातगेघर ला !
घोटा भर चिखलात पाय रुतविल्याशिवाय कोठेही जाता येणार नाही ,आणि कोणत्याही दिशेला पाहिले तरी धुक्यात बुडालेल्या डोंगराशिवाय काही दिसणार नाही ,ओढे -नदी ,पाट ,पाणी भरलेली शेती अशी 'शिण शिणरी ' तिथे होती . .
शेतात बैल ,औत ,कुळव यांच्या मागे मागे शेपटाप्रमाणे आम्ही जायचो . . (एकदा कुळ्वावर बसलेलो असताना खाली पडून माझ्या अंगावरून कुळव सहीसलामत पुढे गेलेला आजही आठवतोय !
पोरांचे पावसाळी उद्योग म्हणजे डोंगरात ,शेताच्या बांधावर माती शोधून कुठे चिकण माती बेन्दराचा बैल करायला मिळतेय का हे पाहणे . तशी मिळाली कि मग बैल जोडी करून त्याला काडीने डोळे वगेरे जिवंतपणा आणायचा .
त्यातही आमचा विशेष जीव असायचा पिवळी चिकणमाती शोधायचा ! ती तशी मिळाली कि त्यातून घडणारे बैल पिवळ्या रंगाचे असायचे . .
आज बेंदूर आहे . .
तस्साच येडा पाउस पडतोय ,मस्त कुंद धुंध वातावरण आहे . .
लहानपणीचे मैतर शहराच्या ' ट्रापिक' च्या गर्दीत कुठे दिसताहेत का पाहतोय ,'शेर ' गावात शिल्लक डोंगरात चिकणमाती शोधायला मिळेल का ,विचार करतोय ,आपल्या हाताने घडविलेल्या बैल जोडीला ठेवायला भिंतीत 'देवळी ' सापडेल का पाहतोय . .
कुठे हरवले यार हे सारे ?
कुठे हरवले ते निरागस दिवस ?
ती चिकणमाती,ते बैल,
तो बेंदूर !

No comments:
Post a Comment