अगदी डोळ्यादेखत
ज्येष्ठ
कवयित्री ( आणी आचार्य अत्रे यांच्या कन्या ) शिरीष पै यांच्याशी फोन वर
खूप छान बोलणे झाले...२००० ते २००२ या काळात त्यांच्याशी लेखांच्या
निमित्ताने खूप चर्चा -भेटी व्हायच्या .
शिवाजी पार्क जवळ समुद्र किनार्यावरील त्यांच्या घरी नेहमी भेट होत असे
...प्रदीर्घ काळानंतर हि त्यांनी मला ओळखले ,आवाज ओळखला याचा आनंद आहे...गुरुवारी त्यांची ' थेट भेट ' होणार आहे...जुन्या स्मृतींना उजाळा...
' तुमचे येणे कमी झाले ,आणी माझे लेख लिहिण्याचे जवळ जवळ थांबलेच ',असे त्या म्हणाल्या तेव्हा वाईट वाटले...त्या बोलायच्या आणी मी शब्दांकन करायचो ,असा काल होता तो.
महाराष्ट्रातील २५ तरी मान्यवरांना असे शब्दांकन द्वारे लिखाण करायची सवय आमच्यामुळे लागली होती...
मराठी दैनिकांना सहजगत्या मोठ्या व्यक्तींचे लेख मिळायचे .आता आम्ही ' न्यूज अजेन्सी ' म्हणून पुढे आल्याने बातम्याच्या मागे गेलो .आणी लेख लिहिणे ,शिरीष ताईंचे काय आणी माझे काय ,थांबलेच ...
कधी कधी विषय खुणावतात,शब्द जुळतात...पण त्याचा लेख होण्याची बैठक जुळत नाही ....... '
' लेखांचे दिवस ' आठवले कि डोळ्यात हळुवार पाणी येते खरे.
नकळत आपण बरेच काही गमावत असतो...अगदी डोळ्यादेखत

--
No comments:
Post a Comment