आज चा दिवस 'प्रचीती गप्पांचा ' आणि 'गप्पातून प्रचीती ' येण्याचा...!
ज्ञान प्रबोधिनीच्या 'प्रचीती ' या युवा संघटनेत आम्ही जवळ जवळ २०० युवक-युवतींनी डॉ.विवेक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 'विकसन हेच तत्वज्ञान ' आणि 'समन्वय हीच कार्यपद्धती ' चे धडे प्रशिक्षण आणि कृतीतून गिरवले ...ज्यात झोपड पट्टीतील काम होते,ग्रामीण प्रज्ञा विकास,स्पर्धा परीक्षा केंद्र ,संवाद मासिक,संघटन,अभ्यास शिबिरे ,अभ्यास दौरे,आदिवासी भागात १०० दिवसांची पदसरे शाळा ,उसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी १०० दिवसांची साखर शाळा असे खूप काही होते.त्यालाच अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि अविनाश धर्माधिकारी यांनी राजीनामा दिल्यावर प्रत्यक्ष सार्वजनिक जीवनातील पदार्पण अशा अनौपचारिक अनुभवांचा -सहभागाचा समावेश होता.देश प्रश्नांचा अभ्यास करताना अगदी ठाणे जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांच्या अभ्यास दौर्यापासून काश्मीर प्रश्न अभ्यास दौरयापर्यंत जाणिवांचा प्रवास होता.'भविष्य वेध ' (फ्युचरालॉजी ) काही अभ्यास केला..
या युवा गटातील अनेक जण आज स्वयंसेवी संस्थांबरोबर मोलाचे काम करत आहे.अनेक जण प्रशासन ,प्रसार माध्यमे आणि शिक्षण क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत.समाजातील प्रश्नांवर काम करायचे तर अशीच क्षेत्रे निवडून आयुष्यभर काम करायचे अशी जवळपास 'शपथ ' च आम्ही मंडळीनी घेतली होती...आणि तिचे पालन करीत आहोत.
साधारण वर्षातून आम्ही सारे भेटतो...अनौपचारिक गप्पा मारतो.यंदा ज्ञान प्रबोधिनीचा सुवर्ण महोत्सव आहे...त्या पार्श्व भूमीवर आणि त्या वस्तू मध्ये होणारी आजची बैठक -गप्पा मला खूप महत्वाची वाटते .१९९० च्या दशकातील मधले हे सारे प्रशिक्षण -अनुभव ,२००० नंतर दशकभर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करून आता २०१२ नंतर च्या परिस्थिती वर काय काम करता येईल असा जणू अंदाजच आम्ही घेत आहोत...
म्हणून आज ' प्रचीती गप्पा ' आणि ' गप्पातून प्रचीती ' !
..........
25/09/2012

No comments:
Post a Comment