घटस्थापना झाली ...नवरात्र झाले ..आज विजयादशमी !
मला आठवते माझ्या आजोळी जावली तालुक्यातील खर्शी जवळ हात्गेघर येथे लहानपणी या घटात पेरलेले धान्य नऊ दिवसात उगवल्यावर ..दसर्याला त्याचे तुरे आम्ही मुले आणि तरुण मंडळी डोक्यावरील पांढर्या गांधी टोपीत खोचून मिरवत असू ! परवा माझ्या घटस्थापना पोस्ट वर कॉमेंट करताना ज्येष्ठ कार्यकर्ते भारत पाटणकर म्हणाले ' हा कृषी संस्कृतीचा सण आहे ! ' .
खरे आहे हि कृषी संस्कृती चे घट हे छोटे रूप आणि त्यातील उगवून आलेले तुरे आजही लहान मुलासारखे टोपीत मिरवावेसे वाटतात ....
विजयादशमी ,सीमोल्लंघन ..दसरा ! वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याची आपली प्रेरणा अक्षय राहो ,हीच शुभेच्छा !
सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा ..

No comments:
Post a Comment