माळीण दुर्घटना झाली तेव्हा महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्विस ' च्या रुग्णवाहिका तातडीने पोचल्या होत्या . दुसऱ्या दिवशी या सेवेच्या , दुसऱ्या दिवशीच्या तुकडीबरोबर अधिकाऱ्यांसमवेत मी माळीण ला जाण्यासाठी पहाटे ३ वाजता निघालो . दुर्घटनेच्या सकाळी माळीण गावात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (डायल १०८ ) च्या रुग्णवाहिकेतून पोचलो . पहाटे ३ वाजता मी घर सोडले तेव्हा तिथे पोहोचू याची खात्री होती . अत्यंत खडतर प्रवास ,पाउस ,पोलिसांनी अडवलेले रस्ते असा माहोल होता . काही प्रवास पोलिसांच्या वाहनातून केला . नंतर ३ किलोमीटर चालत माळीण गाठले . तिथे डोंगर कोसळलाय असे वाटत नव्हते . माती वाहून आली आहे असे वाटत होते . डायल १०८ च्या रुग्णवाहिकांचे अव्याहत काम चालू होते . हि विनामुल्य सेवा शासनातर्फे बी व्ही जी इंडिया हि पुण्यातील कंपनी राज्यभर देते . २६ जानेवारीला उद्घाटन झाल्यांनतर इतकी मोठी दुर्घटना प्रसंगी मदतकार्य करण्याची हि पहिलीच वेळ १०८ वर आली .
सकाळी साडेसात ला दुर्घटना घडल्यावर १०८ ला अकरा वाजता दूरध्वनी आला . अर्ध्या तासात सुसज्ज रुग्णवाहिका तिथे पोचल्या . सायंकाळी त्यांनी प्रमिला लेंभे ,रुद्र लेंभे या मायलेकांना वाचवले . रुग्णालयात हलवले आणि नंतर जखमी आणि मृतदेह हलविण्याचे काम अव्याहत सुरु आहे .
आम्ही बीव्हीजी चे उपाध्यक्ष उमेश माने यांच्यासमवेत माळीण ,आडिवरे ,मंचर ,घोडेगाव येथील रुग्णवाहिका टीम चे पायलट ,डॉक्टर मंडळींची विचारपूस केली . रात्रभर न जेवलेल्या टीम ला जेवू घातले . व्यवस्था लावल्या आणि ताज्या दमाच्या तुकड्या बोलावल्या . पहिल्या दिवशी २८ रुग्णवाहिकांचा ताफा चार ठिकाणी तैनात होता . ६ जखमींना उपचारार्थ हलविण्यात आले . ७२ हून अधिक मृतदेह हलविण्यात आले .
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (एम ई एम एस ') चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ ज्ञानेश्वर शेळके ,डॉ प्रवीण साधले राज्य सरकारच्या आरोग्य खात्याबरोबर समन्वय साधून मदत कार्यातील व्यवस्था लावत होते . तर बी व्ही जी इंडिया चे अध्यक्ष एच आर गायकवाड उपयुक्त सूचना देत होते
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (एम ई एम एस ') चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ ज्ञानेश्वर शेळके ,डॉ प्रवीण साधले राज्य सरकारच्या आरोग्य खात्याबरोबर समन्वय साधून मदत कार्यातील व्यवस्था लावत होते . तर बी व्ही जी इंडिया चे अध्यक्ष एच आर गायकवाड उपयुक्त सूचना देत होते
महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेल्या एका महत्वाच्या मदत कार्यात कामाची,कर्तव्य बजाविण्याची संधी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (डायल १०८ ) आणि ओघाने मला ,माझ्या back office ला म्हंजे 'प्रबोधन माध्यम ' ला मिळाली . . दुर्दैव इतकेच कि जीव वाचविण्याची फार सवलत निसर्गाने माणसाला ठेवली नव्हती .
No comments:
Post a Comment